कोवाड येथे देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2019

कोवाड येथे देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

कोवाड (ता. चंदगड) येथे देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करताना कोवाड मधील व्यापारी वर्ग.
कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात विविध ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कोवाड (ता. चंदगड) येथील सर्व व्यापारी वर्गाने एकत्र येऊन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज मोठ्या जल्लोषात साजरा केला. त्यांनी देशाप्रती दिलेल्या योगदानामुळे देशभावनेतून एकत्र येऊन येथील संपूर्ण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी मिळून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नदीपलिकडिल व्यापारी वर्ग
डिजिटल फलकाचे अनावरण करुन फटाकयांच्या आतीषबाजीने सर्वत्र पेढ़े वाटून आनंदाने वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर भाजपा प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोवाड येथील पुरग्रस्त व्यापाऱ्यांना भाजप पक्षाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. त्याचबरोबर याकामी पाठपुरावा केलेले भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेवराव पाटील अणि स्थानिक सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांचे यांचे आभार मानले.
फलकाचे अनावरण करताना कोवाड शहर प्रमुख सुरेश वांद्रे व इतर कार्यकर्ते.
यावेळी भाजपा शहरप्रमुख सुरेश वांद्रे, कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे, मल्लिकार्जुन वाली, श्रीधर पाटील, उत्तम मुलिक, गुलाब पाटील, सचिन पाटील, मुस्तफा मुल्ला, नरसु पाटील, मयुर हजारे, गणपत भोगन, रानबा पाटील, दिलीप केसरकर, विठल वांद्रे, सोमनाथ महागांवकर, वसंत वांद्रे, जगदीश अंगडी, काशीनाथ जाधव, अजित पाटील, जोतिबा भोगण, आनंद पाटील, परसु लांडे, अनिल पाटील, लक्ष्मण तोगलेकर, नंदू बेळगांवकर, बाळु गिरी यांच्यासह सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते.
पेढ़े वाटून आनंद साजरा करताना व्यापारी वर्ग.
त्याचबरोबर नदीपलिकडील व्ही. के. दळवी, संदीप सुतार, पुंडलिक सुतार, दिनकर पाटील, विश्वनाथ बिर्जे, दयानंद पाटील, बाळु महागांवकर, राजू भोगण यांच्यासह सर्व व्यापारीवर्गाने या आनंदात सामील होत डिजिटल फलक लावून पेढ़े वाटून वाढदिवस साजरा केला.


No comments:

Post a Comment