जिल्हा बॅकेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणार - राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2019

जिल्हा बॅकेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणार - राजेश पाटील

शिनोळी येथे महिला सबलीकरण  मेळावा
शिनोळी (ता. चंदगड) येथे माहिला सबलीकरण मेळाव्यात बोलताना सौ. सुस्मिता राजेश पाटील.
 चंदगड  / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा बॅकेच्या सहकार्याने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सहकार्य करून त्याना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅकेचे संचालक राजेश पाटील यानी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे आयोजित  माहिला सबलीकरण मेळाव्यात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी सौ. सुस्मिता राजेश पाटील होत्या.  
प्रारंभी कै. नरसिंगराव पाटील व कै. सौदामिनी नरसिंगराव  पाटील यांच्या प्रतिमेंचे पूजन  करण्यात आले. राजेश पाटील पूढे म्हणाले, ``गोरगरिब बहिणींना तालुका संघाच्या आणि विविध संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. मला अजूनही खूप काही या तालुक्यासाठी करायचं आहे. फक्त मला तुमची साथ हवी आहे. येणाऱ्या निवडणुकीत तुमचा भाऊ, मुलगा मानून  मला आशीर्वाद घ्या. मी नक्कीच तुमचा विश्वास सार्थ ठरवेन असे भावनिक आवाहनही त्यांनी  यावेळी  केले. यावेळी  महिला  विकास कक्ष अधिकारी  गंधाली दिंडे यानी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक उदोग करता येतात. पण आपल्याला त्याची माहिती नसते. पण यापुढे महिलांना सक्षम बनवण्याचे काम शासन बचत गटाच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून उपस्थित माहिलांना साबण, निरमा, निळ, केक, अगरबत्ती आदी वस्तू कशा बनवाव्यात याचे प्रात्यक्षिक करून दाखवली.
महिला सबलीकरण मेळाव्यावेळी उपस्थित महिलावर्ग.
सौ. सुश्मिता पाटील यांनी माझ्या सासू कै. सौदामिनी पाटील यांचे स्वप्न होते की तालुक्यातील महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. ते स्वप्न तुलसी बाझारच्या माध्यमातून राजेश पाटील पूर्ण करत आहेत.  तालुक्यातील महिलांच्यासाठी आणखी काम करायचे आहे. चंदगड मधील माहिलांनीही काम करणाऱ्यांच्या
पाठीशी  ठामपणे उभे रहा असे आवाहन  केले. बाल विकासच्या सुनिता प्रभू यांनी महिलांनी लहान बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. बाळाच्या लसीकरण, पोषण व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली. यावेळी सौ मनीषा अनिल बेनके, माजी सभापती सौ .ज्योतीताई पवार पाटील, तालूका संघाच्या संचालिका सौ. विजयमाला कोकीतकर, श्रीमंता कृष्णा  सलाम, सुजाता दिपकराव जाधव यांच्यासह तालुक्यातील बचत गटाच्या  महिला मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या. यावेळी व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कबड्डी स्पर्धेत देशात नंबर मिळवल्याने संघातील महिला खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

No comments:

Post a Comment