श्रमाच्या जोरावर यशाच्या शिखरावर चढता येते - संजय पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2019

श्रमाच्या जोरावर यशाच्या शिखरावर चढता येते - संजय पाटील


चंदगड / प्रतिनिधी
श्रमसंस्कृतीतूनच  माणूस घडतो. विद्यार्थ्यी दशेतच खरा माणूस घडतो. विद्यार्थ्यांनी श्रमाला लाजु नये. श्रमाच्या जोरावर यशाची शिखरावर चढता येते असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटन म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. वाय. निंबाळकर होते.
प्रारंभी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. राजेश घोरपडे यांनी केले. रोपाला पाणी घालून व्रुक्ष लागवडीचा संदेश देत उद्घाटन संपन्न झाले. मान्यवरांचे स्वागत प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. निंबाळकर यांनी श्रमसंस्क्रुतीचे महत्त्व आणि आदर्श नागरिकात्वाची तत्वे समजून घ्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रमाशी सांगड घाला असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक समिती सदस्य डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. शाहू गावडे,  प्रा. नंदकुमार पाटील, उपस्थित होते. प्रा. एम. बी. मापटे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सी. ए. तेली यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment