कोवाड येथे पूरग्रस्त कुटुंबांना जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करतांना श्रीकांत पाटील, अर्जुन चाळुचे, सुनील कुंभार, राजेंद्र हेरेकर आदी. |
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा चंदगडच्या वतीने तालुक्यातील शंभरावर अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चंदगड तालुक्यात झालेल्या न भूतो अतिवृष्टी व महापूर यामुळे घरे व शेतीचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेकडो कुटुंबे उध्वस्त झाली. अशा कुटुंबांना मदतीसाठी हजारो हात पुढे आले. प्राथमिक शिक्षक संघ चंदगडच्या शिक्षक बांधवांनी सुद्धा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून पूर बाधित गावातील शंभर कुटुंबांना जीवनोपयोगी विविध वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. यापैकी कोवाड येथील निराधार सहा कुटुंबांना केंद्र शाळा कोवाडचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, शिक्षक संघाचे कार्यकर्ते अर्जुन चाळूचे, सुनील कुंभार, राजेंद्र हेरेकर, बाळकृष्ण मुतकेकर, पा.रा. पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले.कोवाड सह भागातील राजगोळी बुद्रुक, दुंडगे या गावातून ही साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थींसह विरभद्र हेरेकर उपस्थित होते. सुनील कुंभार यांनी प्रस्ताविक व आभार मानले.
No comments:
Post a Comment