कोवाड ते मांडेदुर्ग रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मनसेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2019

कोवाड ते मांडेदुर्ग रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मनसेची मागणी

रस्त्याबाबतचे निवेदन देताना मनसेचे कार्यकर्ते. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
मार्च एप्रिल 2019 मध्ये चंदगड तालुक्यातील कोवाड ते मांडेदुर्ग दरम्यानचा रस्ता करण्यात आला होता. यात रस्त्याची रुंदी करण्यासह मोरी, साईड पट्टी यांचा समावेश होता. मात्र हा निकृष्ट दर्जाचा झालेला असून मे महिन्यात हा रस्ता उधळला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या रस्त्याबाबतचे बिल तात्काळ थाबवावे. कॉलिटी कॉन्ट्रोल मार्फत रस्त्याची तपासणी व्हावी. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यलयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी विवेक मनगुतकर, राजाराम गोंधळी, निलेश बिर्जे, निलेश चौकुळकर, सुरज धाटोंबे, सागर धाटोंबे, सत्वशील पाटील,  अविनाश पाटिल उपस्थित  होते.


No comments:

Post a Comment