जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 25 लाखांचा निधी विकासकामासाठी मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2019

जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून 3 कोटी 25 लाखांचा निधी विकासकामासाठी मंजूर

जि. प. सदस्य सचिन बल्लाळ
चंदगड / प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी जिल्हा परिषदेच्या "क" वर्ग पर्यटन स्थळ विकास निधी, जनसुविधा, आरोग्य समिती, डी. पी. डी. सी. च्या ३०५४ व ५०५४ अंतर्गत तब्बल 3 कोटी 25 लाखांचा निधी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी मंजूर केला असल्याची माहीती जि. प. सदस्य श्री. बल्लाळ यांनी दिली. 
स्वनिधीतीन जिल्हा परिषद कोल्हापुर येथे चंदगड भवन इमारत करणे ६ लाख. एकात्मिक बाल विकास कार्यक्रम अंतर्गत नांदुरे व कोकरे गावासाठी अंगणवाडी नविन इमारत बांधकामासाठी 17 लाख. "क" वर्ग पर्यटन स्थळ विकास निधी श्री दत्त देवस्थान, श्रीपादवाडी परिसर सुशोभिकरण मंदिरसाठी पाच लाख, श्री रवळनाथ मंदीर, हेरे परिसर सुशोभिकरण ४ लाख, श्री रवळनाथ मंदीर, हेरे परिसर पथ दिवे बसविण्यासाठी  १ लाख. जनसुविधा मधुन गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व कॉक्रिटीकरणासाठी ग्रामपंचायत शिरगाव येथील मदरसा मशिद समोरील रस्ता करणे ३. ५० लाख, मौजे ढेकोळी अंतर्गत गटर्स करण्यासाठी १.५० लाख, मौजे माणगाव येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी ३ लाख, अडुरे येथील अंतर्गत  रस्ता डांबरीकरणासाठी ५ लाख. आरोग्य व विशेष शाळा दुरुस्ती विभागाच्या चंदगड येथे पशुसंवर्धन उपकेंद्राची नवीन इमारत बांधण्यासाठी १९ लाख. 
शाळा दुरुस्तीसाठी विद्या मंदीर इब्राहिमपूर, वि.म भोगोली, वि.म केरवडेपैकी पाटिलवाडा, वि.म गणूचीवाडी वि.म कलिवडे, वि.म पिळणी, कन्या शाळा चंदगड सुसज्य प्रयोगशाळा, उर्दू शाळा चंदगड सुसज्य प्रयोगशाळा, जनसुविधा मधुन गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व कॉक्रिटीकरण, ग्रामपंचायत शिरगाव येथील मदरसा मशिद समोरील रस्ता करण्यासाठी ३.५० लाख, मौजे ढेकोळी अंतर्गत गटर  करणे १.५० लाख, मौजे माणगाव येथील अंतर्गत डांबरीकरण रस्ते रुपये ३ लाख, अडुरे येथील अंतर्गत  रस्ता डांबरीकरणासाठी ५ लाख. डी. पी. डी. सी. च्या ३०५४ व ५०५४ मधुन रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे.  बिजुर ते भोगोली डांबरीकरणासाठी ६४ लाख, कानुर बु ते काळगुंवाडी ते भोगोली रस्ता ४० लाख, मलगेवाडी फाटा ते मलगेवाडी  रस्ता २० लाख. दलित वस्ती सुधारणा  अंतर्गत रस्ते, गटर्स डांबरीकरण व कॉक्रिटीकरणासाठी काजिर्णे समाज मंदीर बाधंकाम ७ लाख, म्हाळुंगें अंतर्गत ५ लाख, सातवणे अंतर्गत रस्ता ८ लाख, हिंडगाव ६ लाख, भोगोलीपैकी रायचीवाडी विहिरी दुरुस्ती व पंप बसवणे ६.५० लाख रुपये मंजुर केले आहेत. याकामी त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी घेवून विकासकामांचा आराखडा तयार केला आहे. 



No comments:

Post a Comment