![]() |
चंदगड तालुक्यातील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, नामदेव पाटील व इतर. |
"पालक मंत्री चंद्रकात पाटिल आणि चंदगडच्या हरीत क्रांतीचे प्रणेते माजी राज्यमंत्री श्री भरमु आण्णा पाटील यांच्या माध्यमातूंन आगामी काळात चंदगड मतदार संघाचा कायापालट करणार असुन भरमू आण्णा पाटील यांच्या मंत्रिपदाच्या काळात कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे धरणांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघात केलेला विकास आज ही लोक विसरलेले नाहित हे आज च्या लोकांनी दिलेल्या प्रतिसादाने अधोरेखीत होत' असे मत जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी केले. ते चंदगड तालुक्यातील विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, हरीतक्रांती चे प्रणेते श्री भरमु आण्णा पाटील यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद सदस्य श्री सचिन बल्लाळ यांच्या दुसरया टप्प्यातील ३ कोटी २५ लाख, विकासकामांचा भव्य शुभारंभ माजी मंत्री भरमू आण्णा पाटील,जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या समवेत गोपाळराव पाटील, सभापती बबनराव देसाई,शिवाजीराव पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष नामदेव पाटील,सुनिल काणेकर, मुरलीधर बल्लाळ, विशाल बल्लाळ, रामू पारसे, प्रसाद तेंलग,पंकज तेंलग,विशाल बल्लाळ,विलास थोरवत,संतोष गावडे,बाळू पाटिल,विठ्ठल तेजम,शंकर सुतार,परशराम उपळकर,परशराम पारधी, एकनाथ पाटील,बापू मटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
चंदगड,भोगोली,हेरे,श्रीपादवाडी,आडूरे,सातवणे,मलगेवाडी,कोकरे,नांदुरे,माणगाव,ढेकोळी,शिरगाव, इब्राहिमपूर, गणुचीवाडी, कलिवडे,पिळणी,केरवडे पैकी पाटीलवाडा,हिंडगाव या गावांचा प्रामुख्याने यात समावेश आहे.असे सांगून पुढे बोलताना सचिन बल्लाळ म्हणाले, की चंदगड तालुक्याच्या इतिहासां मध्ये ही पहीलीचं वेळ असेल की जिल्हा परिषदेच्या माध्यमातूंन कोट्यवधीचा निधी तालुक्याला उपलबध झालाअसुन ही तर सुरवात आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर राहिलेल्या गावानां निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास सचिन बल्लाळ यांनी या निमित्ताने व्यक्त केले.यावेळी माजी राज्य मंत्री भरमुआण्णा पाटील, भाजपा कार्यकारणीचे सदस्य गोपाळराव पाटील, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment