![]() |
चंदगड विधानसभेसाठी चंदगड येथे मतमोजणी करावी, या मागणीचे निवेदन देताना माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, शिवानंद हुंबरवाणी, बाळु हळणणकर, संजय सबनीस व इतर.
|
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये संपुर्ण चंदगड तालुका, गडहिंग्लज मधील चार जिल्हा परिषद मतदारसंघ व आजऱ्यातील एक जिल्हा परिषद मतदारसंघ असा मिळून चंदगड विधानसभा मतदारसंघ बनला आहे. चंदगड विधानसभा मतदार संघाचे नाव हे चंदगड आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक मतदानानंतरची मतमोजणी चंदगड येथे व्हावी अशी मागणी चंदगडवाशीयांनी चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मतदारसंघाला चंदगड हे नाव असताना गेल्यावेळची विधानसभा मतदार संघाची मतमोजणी गडहिंग्लज येथे घेण्यात आली होती. चंदगड संपुर्ण तालुका या मतदार संघामध्ये समाविष्ट आहे आणि मतदार संघाचे नाव सुद्धा चंदगड आहे. गडहिंग्लज शहर हे चंदगड मतदार संघामध्ये समाविष्ट नाही. चंदगड येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणीसाठी प्रशस्त व अद्यावत सोईसुविधानियुक्त असे सभागृह आहे. इमारतीला लागूनच पोलिस स्टेशनही आहे. त्यामुळे चंदगड येथे होऊ घातलेल्या विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी केंद्र चंदगड येथे ठेवावे अशी मागणी निवेदनातून तहसिलदार यांच्याकडे केली आहे. निवेदनावर निवेदनावर शिवानंद हुंबरवाडी, बाबूराव हळदणकर, संजय खासनीस, बाळासाहेब हळदणकर, विरेंद्र कांबळे, वैभव देशपांडे, चेतन शेरेगार, सोमनाथ हिरेमठ, सुरेश जावडेकर, मारुती गावडे यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment