चंदगड / प्रतिनिधी
जेलुगडे (ता. चंदगड) येथील लघु पाटबंधारे तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या तरुणांचा तलाव्याच्या पाण्यात बूडून मृत्यू झाला. राजू महादेव गावडे (वय-30, रा. जेलुगडे, ता. चंदगड) असे त्यांचे नाव आहे. नारायण गावडे यांनी याबबातची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. राजू गावडे हा तरुण 13 सप्टेंबर 2019 रोजी आंघोळीला जातो असे सांगून दुपारी एक वाजता घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्याचा शोध घेतला. मात्र तो कोठेही आढळून आला नाही. आज 17 सप्टेंबर 2019 रोजी त्यांचा मृतदेह जेलुगडे लघु पाटबंधारे तलावात पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनास्थळीच शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून हवालदार डी. एन. पाटील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment