सुधाकर निर्मळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघटक पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2019

सुधाकर निर्मळे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघटक पुरस्कार प्रदान

सुधाकर निर्मळे
हेरले / प्रतिनिधी
पत्रकारिता  क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  इचलकरंजीतील महात्मा बसवेश्वर बहउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा  राज्यस्तरीय महात्मा
बसवेश्वर आदर्श पत्रकार संघटक पुरस्कार कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळे यांना परमपूज्य मल्लया शांतमुनी व माजी वस्त्रोदयोगमंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार १५ सप्टेबर 2019 रोजी मराठा मंडळ सभागृह झचलकरंजी येथे परमपूज्य मल्लया शांतमुनी शिवाचार्य स्वामी (शिवगंगा मठ, बगलुरू) व माजी वस्त्रोदयोग मंत्री प्रकाश आवाडे याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी राहुल वराळे, अमोल नांद्रे, सुरेश कांबरे, भाऊसाहेब सकट, अवधूत मुसळे, सलीम खतीब, सुजय निर्मळे, संजना निर्मळे, सतिश लोहार आदीसह विविध क्षेत्रातील पुरस्कारकर्ते, लिंगायत समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment