काजू बोंडावर प्रक्रिया व पशुखाद्य निर्मितीच्या कारखान्यासाठी प्रयत्नशील - अध्यक्ष राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2019

काजू बोंडावर प्रक्रिया व पशुखाद्य निर्मितीच्या कारखान्यासाठी प्रयत्नशील - अध्यक्ष राजेश पाटील

शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका संघाच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष राजेश पाटील.
चंदगड / प्रतिनिधी
तालुका संघावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे जनतेच्या आशिर्वादावर आतापर्यंत तालुका संघाची घोडदौड सुरु आहे. चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमणाता काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र या काजू बिपासून मिळणारे बोंड बऱ्याचदा जागीच सडून जाते किंवा गोव्याच्या व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने विक्री केली जाते. त्यामुळे काजू बोंडावर प्रक्रिया करणारा उद्योग व पशुखाद्य निर्मितीचा कारखाना काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यानी केले.  शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. अहवाल वाचन व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी करून संघाला आर्थिक वर्षात ३१ लाख ७२ हजार रूपयांचा नफा झाल्याचे सांगितले.
  शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित सभासद व हितचिंतक.
राजेश पाटील पुढे म्हणाले,``तुलसी बझारची संपल्पना लोकप्रिय होत असल्याने सभासदांनी आवश्यक वस्तु या बझारमधून खरेदी करुन संघाला सहकार्य करावे. संघाला झालेल्या नफ्यातून सभासदांना लांभाश स्वरूपात तीन लिटर येशेल तेल देणार सांगितले. सरकारकडे पाठविलेला संघाच्या मल्टीस्टेटचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास संघाच्या मिश्रखताला बेळगावसह कर्नाटकची बाजारपेठे ऊपलब्ध होणार आहे. तालुक्यात रताळी, फणस,केळी बटाटा, मका या पिकापासून वेफर्स बनवणार  आहे. यावेळी संघाच्या कर्मचार्याना 15 टक्के पगारवाढ व 16.33 टक्के बोनस जाहीर करून स्व. नरसिंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ मल्टीयुटीलिटी सभागृह बांधणार असल्याचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी सांगितले.``
यावेळी संघाला राज्यशासनाचे  अटल महापणन व सहकार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भिमराव चिमणे यांच्या हस्ते राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर संघाला जास्त रताळी व बटाटे पूरवणारे शेतकरी आप्पाजी करडे,खाचू पाटील महादेव करडे ,फकीरा मनवाडकर, खाचू मेलगे, भरमाना अडकूरकर यांचा तर अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारे माजी व्यवस्थापक बी. पी. कोकीतकर यांचा सपत्निक  तर सर्वाधिक उलाढाल करणाऱ्या आर. जी. बिर्जे, एम. एम. गावडे, एन. ओ. आनंदाचे, बी. जे. गावडे, एस. एच. नार्वेकर, एस. आर. बांदिवडेकर, डी. जे. पाटणेकर यांचाही यावेळी रोख रक्कम  व भेटवस्तू देऊन संचालकाच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य अरूण सुतार, भरमाणा गावडे, रा. नि. गावडे, बंडा चिगरे, नारायण भाटे, भिकू गावडे, शिवाजी कालकुंद्रीकर आदीनी चर्चेत सहभाग घेतला. तानाजी गडकरी, विठोबा गावडे, परसू पाटील, पुंडलिक पाटील, अभय देसाई, राजू जाधव, अली मुल्ला, रामचंद्र बेनके, विठ्ठल पावले, दयानंद पाटील, महादेव चौकूळकर, जानबा चौगूले, विजया कोकीतकर, विद्या चिटणीस  आदी संचालक उपस्थित होते. गुंडू शिवनगेकर यांनी सुत्रसंचालन केले. उपाध्यक्ष पोमाणा पाटील यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment