चंदगड मतदार संघातील निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2019

चंदगड मतदार संघातील निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण



चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे  गडहिंग्लज येथे आज प्रशिक्षण झाले. चंदगड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगारकर, सहा . निवडणूक निर्णय अधिकारी शरद मगर , विनोद रणनवरे , दिनेश पारगे यानी सर्व कर्मच्याऱ्याना प्रशिक्षण दिले . या प्रशिक्षण वर्गामध्ये क्षेत्रीय अधिकारी , मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक एक याना निवडणूक प्रकियेची सविस्तर माहिती दिली . यामध्ये विविध यंत्रांची जोडणी, त्यांची हाताळणी , फॉर्म कसे भरावेत , केंद्राची रचना कशी करावी याचे  मार्गदर्शन करण्यात आले . गांधीनगर येथील गणेश मंगल कार्यालयात दोन सत्रामध्ये  व्याख्यान तर बॅ . नाथ पै .विद्यालयात प्रत्यक्ष यंत्र हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले.

No comments:

Post a Comment