चंदगड / प्रतिनिधी
चंदगडता लुक्यातील अंध, अपंग, मुकबधीर, मतीमंद, विधवा, परितक्त्या, निराधार, शेतमजूर व भुमहीन या सर्वांच्या पेन्शन योजनेत एक सप्टेंबर पासून वाढ झाली आहे. या पेन्शनरांना नवीन वाढीनुसार पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विहीत नमुण्यात फाॅर्म भरून द्यावेत. प्रहार अपंग संघटनेच्या हलकर्णी (ता. चंदगड) येथील कार्यालयाशी संपर्क साधून फाॅर्म भरावेत असे आवाहन केले आहे. अर्जासोबत अपंग दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, युनिक आयडी नोंदणी रिसीटचे झेरॉक्स आणावे असे संघटनेच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment