कोवाड परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2019

कोवाड परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ

राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी व इतर मान्यवर.
कोवाड / प्रतिनिधी   
कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती योजने अंतर्गत आज किणी कर्यात भागातील राजगोळी बुद्रुक,  तळगुली, कोवाड अणि दुंडगे या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जि. प. सदस्य अणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मा मल्लिकार्जुन मुगेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
कोवाड मधील श्री राम नगर हरिजन  वस्ती येथील रस्ता कामाच्या शुभारंभ करताना  कोवाड शहर प्रमुख सुरेश वांद्रे व इतर.
विकास कामामध्ये दुंडगे हरिजन वस्ती रस्ता करने साठी 2 लाख रु ,कोवाड श्रीराम नगर हरिजन वस्ती रस्ता करने साठी 4 लाख रु,दिण्डलकोप/तळगुली हरिजन वस्ती रस्ता करने 3 लाख रु,उमगाव/न्हावेली नांगरे गल्ली गटर्स करने 2 लाख रु,किणी मध्ये अंबेडकर नगर रस्ता करने 3 लाख रु,गवसे फुले वस्ती रस्ता व गटर्स करने 5 लाख रु,अड़कुर हरिजन वस्ती साठी रस्ता व गटर्स करने 3 लाख रु,बुझवड़े गावातील हरिजन वस्ती तील रस्ता व गटर्स करने साठी 4 लाख रु,तांबुळवाड़ी येथील सावंतवाड़ी रस्ता करने कामासाठी 3 लाख रु अणि राजगोळी बू येथे खनिकर्म विकास निधि 6 लाख व दलित वस्ति रस्ता करने 5 लाख असा सर्व निधि हा जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.
दिंडलकोप व तळगुळी हरिजन वस्ती येथील रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्या उपाध्यक्ष भाजपचे मल्लिकार्जुन मुगेरी, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भावकु गुरव व इतर
याकामी राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, तालुकाध्यक्ष नामदेवराव पाटील तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकार्याच्या पाठपुरावा कामी आला आहे. प्रथमतः राजगोळी बू.अणि तळगुळी या ठिकाणी मल्लिकार्जुन मुगेरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.यावेळी युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष भावकु गुरव,राजगोळी बू.चे सरपंच शिवाजी सडाके, यल्लापा भरमगावड़ा,नारायण बेळगावकर, कल्लू पाटील, धोंडीबा भरमगावडा, तळगुळीचे सरपंच जुबेर काझी, वैजू किणीकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कोवाड मधील तांडा  वस्ती येथील रस्ता कामाचा शुभारंभ करताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुगेरी व इतर.
त्यानंतर कोवाड येथील श्रीराम नगर दलित वस्ती मध्ये अणि तांडा वस्ती मध्ये रस्ता करने कामी श्री. मुगेरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कोवाड शहर प्रमुख सुरेश वांद्रे, भरमु पाटील, भावकु गुरव, वसंत व्हन्याळकर, मारुती वांद्रे, कल्लापा वांद्रे, प्रताप पाटील, आदम मुल्ला, रामा पाटील, विठल बुवा, बाळु गिरी,रामचंद्र भोगन, विनायक भोगन इ सर्व उपस्थित होते.

No comments:

Post a Comment