चंदगड ते चंदगड फाटा रस्त्याची रुंदी वाढवून वाहतुकीला योग्य बनविण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2019

चंदगड ते चंदगड फाटा रस्त्याची रुंदी वाढवून वाहतुकीला योग्य बनविण्याची मागणी


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
चंदगड फाटा ते चंदगड शहरापर्यंत असणारा सध्याचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून वाहतुक करणे म्हणजे कसरतच करावी लागते. वाढलेली वाहतुक पाहता रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण व्हावे अशी मागणीचे निवेदन परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपअभिंयता यांना दिले.
तालुक्यातील चोहोबाजुनी सरकारी कामाकरता तसेच विद्यार्थी वर्ग शाळा- महाविद्यालयांना चंदगड या तालुक्याच्या ठिकणी येतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक वाढली आहे. बऱ्याच वेळेला तक्रार केल्यानंतर खड्डे तात्पुरते भरले जातात. या मार्गावरील सद्याची वाहतुक पाहता रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण होण्याची गरज आहे. त्यानुसार सद्या मंजुर असलेल्या टेडंरमध्ये रुंदीकरण वाढीव रस्त्याचा प्रस्ताव सादर करावा असे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.



No comments:

Post a Comment