महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग रहावे-ॲड. लीना देशपांडे - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2019

महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग रहावे-ॲड. लीना देशपांडे


चंदगड / प्रतिनिधी
महिलांच्या संरक्षणासाठी कायदे निर्माण झाले पण सर्व ठिकाणी कायदा महिलांच्या सोबत राहू शकत नाही. त्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ॲड.लीना देशपांडे यांनी केले.
हलकर्णी (ता.चंदगड)येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालया व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे 'अंतर्गत तक्रार समिती'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात'महिला विषयक कायदे व नियम'या विषयावर ॲड. देशपांडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. पी.वाय.निंबाळकर होते. त्या पुढे म्हणाल्या 'योगासने व प्राणायाम दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असून त्यामुळे आपली मानसिक स्थिती सुध्दा उत्तम राहते. आई वडिलांचा सन्मान ठेवत आधुनिक पध्दतीने शिक्षणाची कास विध्यार्थीनीनी सोडू नये. या मार्गानेच आपला विकास निश्चित आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थीनीनी अष्टावधानी राहून देशाचा उत्तम नागरिक व्हावे. कार्यक्रमात डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. प्रियंका नौकुडकर, प्रा. गीतांजली पाटील यांच्यासह बहूसंख्येने विद्यार्थ्यिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व सुत्रसंचालन ग्रंथपाल व्ही.जी.केळकर यांनी केले. तर आभार प्रा.जे.एम.ऊतुरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment