![]() |
अडकूर येथील श्री शिवशक्ती हायस्कूल येथे सही पोषण-देश रोशन या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेला खाद्य महोत्सव. |
शासनाच्या सही पोषण- देश रोशन या पोषण माहिण्याअंतर्गत येणाऱ्या उपक्रमाची अतिशय चांगल्या प्रकारे अंमलबजावणी अडकूर केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळानी केली आहे. केंद्रप्रमूख क. ई. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी होत आहेत.
पोषण आहाराअंतर्गत हे सर्व उपक्रम चालू आहेत. यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व सांगणाऱ्या भाषण, चित्रकला, रांगोळी, खादय महोत्सव स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर शालेय आवारातच परसबागेची निर्मिती केली जात आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्था मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तर शिक्षकाकडूनही या मुलांना विविध खाद्यपदार्थांची मेजवाणी मिळत आहे. अडकूर परिसरातील अडकूर प्राथमिक शाळा, येथील शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, मलगेवाडी, गणुचीवाडी, उत्साळी, मोरेवाडी, विंझणे, अलाबादेवी, सत्तेवाडी, बोंजुर्डी आदि गावातील सर्वच शाळामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक अध्पापनाबरोबरच आपला जादा वेळ या उपक्रमाला देत आहेत.
No comments:
Post a Comment