![]() |
विधानसभा निवडणूक प्रशिक्षण ठिकाण चंदगड येथे करण्याचे तहसिलदार विनोद रनवरे यांना निवेदन देताना सदानंद पाटील , सुरेश सातवणेकर , एम .व्ही . कानूरकर , गोविंद पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चंदगड विधानसभा निवडणुकी साठी अधिकारी व कर्मचारी यांचे गडहिंग्लज येथे असणारे प्रशिक्षण केंद्र बदलून ते चंदगड येथे ठेवावे अशी मागणी चंदगड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद रणवरे यांना देण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी चंदगड येथे तहसिल कार्यालयात सूसज्य हाॅल आहे. त्यामुळे गडहिंग्लज येथे घेण्यात येणारी प्रशिक्षण चंदगडला घ्यावीत. क्षेत्रीय अधिकारी, केद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी यासाठी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. इसापूर, कोलीक, तुडये, कानूर, यर्तेन्नहट्टी, राजगोळी, शिनोळी, हेरे येथील शिक्षकांना गडहिंग्लजला प्रशिक्षणाला येण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीचा विचार करता गडहिंग्लजला निवडणुक काळातील होणारी प्रशिक्षने चंदगडला घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. चंदगड तालुका प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक संघटना, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती, शिवाजी विद्यापिठ शिक्षक संघटनां चंदगड एम. व्ही कानूरकर, डाॅ. पी. आर. पाटील, प्रा. एस. एन. मासाळ, प्रा. एस. एम. पाटील, शंकर मनवाडकर, हणमंत पावसकर, बसवंत चिगरे, सदाभाऊ पाटील आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment