![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत संचलिक न्युट्रीयन्स कंपनीने सन 2016/717 मधील ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची बिलाची काही रक्कम तहसिलदाराच्याकडे जमा केली होती. त्या रक्कमेचा धनादेश तहसीलदारांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी जिल्हा बँकेकडे जमा केली. मात्र जिल्हा बँकेच्या चंदगड शाखेकडून ही रक्कम अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेने सोमवारपर्यंत शेतकऱ्यांची बिले खात्यावर जमा न केल्यास बँकेला टाळे ठेकण्याचा इशारा ॲड. संतोष मळविकर यांनी बँकेला दिला आहे.
दौलत संचलिक न्युट्रीयन्स कंपनीने सन 2016/717 मधील साखर विक्री करून द्यावी असे कृती समितीच्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेने 3,14,26,994 रु व अथर्व कंपनीने 1,85,64,000 तहसिलदार यांच्याकडे जमा केले. उर्वरीत रक्कम 15,87,222रु मॉलिसिस व बगॅस विक्री करून तहसीलदार यांच्याकडे जमा झाली. शेतकऱ्यांनची देणी 5 कोटी 15 लाख 87216 रुपयांचा चेक जिल्हा बँकेकडे तहसीलदार चंदगड यांनी जमा केला. मात्र जिल्हा बँकेच्या तालुक्यातील चंदगड शाखेने आजपर्यंत शेतकऱ्यांची बिले त्यांच्या खात्यावर जमा केली नाहीत. येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच सोमवार पर्यंत बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास मंगळवारी जिहा बँकेच्या चंदगड शाखेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दौलत बचाव समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष मळविकर यांनी दिला आहे. यावेळी प्रा. सुनिल शित्रे, विद्याधर गुरबे व नागेश चौगुले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment