अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभीमानी शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2019

अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभीमानी शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

 स्वाभिमानी शिक्षक संघाच्या निवेदनामुळे  अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांना मुळ शाळेतून वेतन काढण्याच आदेशे प्राप्त झाले त्या आदेशासह शिक्षक.
हेरले / प्रतिनिधी 
अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांना काही शाळांनी हजर करुन न घेतलयाने  सव्वा महिना वेतनाचा प्रश्न निर्माण होऊन आर्थिक संकट आले होते. या शिक्षकांची वेतनाची समस्या सोडविण्यासाठी  स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे अतिरिक्त शिक्षकांचा मुळशाळेतून पगार काढण्याच्या आशयाचे लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना  देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन त्यांनी २२ अतिरिक्त शिक्षकांचे मुळशाळेतून पगार काढण्याचे आदेश दिले.
स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे जिल्हाअध्यक्ष मिलींद बारवडे,सरचिटणिस भाऊसाहेब सकट, खजाणिस नंदकुमार कांबळे यांनी अतिरिक्त माध्य. शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न जाणून घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी मुळशाळेतून वेतन काढण्याचे आदेश व्हावेत म्हणून लेखी निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कोल्हापूर, शिक्षण आयुक्त पुणे, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, माध्यमिक शिक्षणाधिकारी आदींना देण्यात आली. 
निवेदनाचा आशय असा,सर्व अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया सन २o१८-१९ समोयोजित शाळेने हजर न करुन घेतलेलेने त्यांचे मुळशाळेतून वेतन अदा होणेचा आदेश व्हावा.सर्व अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेने मिळालेल्या शाळेत दि.२१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर अखेर जात असून अद्याप संबंघित शाळेने हजर करून घेतलेले नसल्याने सर्वांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
त्यामुळे कर्जाचे हप्ते, आई - वडिलांच्या औषधोपचार खर्च, मुलांचा शिक्षण खर्च व उपजिविका ही पूर्णपणे मिळणाऱ्या मासिक वेतनावर अवलंबून असल्याने जोपर्यंत समायोजित शाळा सर्वांना हजर करून घेत नाहीत. तोपर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन न थांबवता मुळ शाळेतून अदा व्हावे या आशयाच्या लेखी निवेदनावर संपुर्ण जिल्ह्यातील अतिरिक्त माध्यमिक शिक्षक नंदकुमार कांबळे , सादिक मणेर, कृष्णात पाटील , संतोष कुंभार , अजित पाटील , संभाजी गावडे , केरबा कांबळे , अनिल रेडेकर , सुभाष पाटील , अशोक पाटील ,हणमंत वाघमारे , शिवाजी ठोंबरे , बाळासाहेब संकपाळ , शंकर हराळे , कल्पना बागडी, स्मिता मोहिते , हेमलता कोळेकर , ऋतुजा नांगरे , माधुरी पाटील , जयश्री वैराट आदींच्या सहया आहेत. स्वाभिमानी शिक्षक संघाच्या निवेदनाची तात्काळ दखल माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी घेऊन या शिक्षकांना मुळ शाळेतून वेतन काढण्याचे आदेश दिले.

No comments:

Post a Comment