हेरे येथे गोवा बनावटीची सव्वातीन लाखांची दारु जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2019

हेरे येथे गोवा बनावटीची सव्वातीन लाखांची दारु जप्त

निवडणूक कालावधीत अबकारी पथकाची मोठी कारवाई

चंदगड / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अबकारी पोलीस पथकाने हेरे (ता. चंदगड) येथील एका किराणा दुकानात अडगळीत लपवून ठेवलेल्या तब्बल तीन लाख सव्वीस हजार सहाशे चाळीस रुपये कींमतीचा गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या प्रकारचा दारू साठा रविवारी पहाटे छापा टाकून हस्तगत करण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान दारूसाठा करुन ठेवणारा संशयित राजेंद्र गवस मात्र पोलीसांना चकवून निसटला. 
राज्य ऊत्पादन शुल्क पोलिस कोल्हापूरचे अधिक्षक वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार उपअधिक्षक गणेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा व गडहिंग्लज विभागात अवैध दारू तस्करी, विक्री व साठा करण्याऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम आखली आहे. याच कामगिरीवर ऊत्पादन शुल्क पोलीस पथक या विभागात असताना चंदगड तालुक्यातील हेरे या ठिकाणी गोवा बनावट दारूचा साठा मोठ्या प्रमाणात हस्तगत केला आहे. ऊत्पादन  शुल्क पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार चंदगड तालुक्यातील हेरे या ठिकाणी राजेंद्र गवस यांच्या घरातील किराणा दुकानात अडगळीत प्लास्टिक ताडपत्रीखाली गोवा बनावटीच्या हायवर्ड फाईन व्हिस्की, मँकडाँल, गोल्डन वाय. एम. डब्लू व्हिस्की, ब्लुअ टुबर्ग, बीयर बाँक्स ईत्यादी प्रकारच्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा  रविवारी सकाळी साडे सहा वाजता हस्तगत केला. याबद्दल राज्य ऊत्पादन शुल्क पोलीस पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हेरे या ठिकाणी गवस यांच्या घरातील दुकानाची तपासणी केली असता अडगळीत प्लास्टिक ताडपत्रीखाली विविध प्रकारच्या दारूच्या बाँक्सचा साठा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे त्याची तब्बल तीन लाख सव्वीस हजार सहाशे चाळीस रुपये एवढी कींमत होते. पोलिसांनी सर्व मुद्दे माल पंचनामा करुन ताब्यात घेतला व गवस याच्यावर कारवाई केली आहे. या छापा पथकात निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नाडे, संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे यांनी ही कारवाई केली. पो. निरीक्षक जगन्नाथ पाटील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment