कुद्रेमानी येथे २२ डिसेंबर रोजी बलभीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2019

कुद्रेमानी येथे २२ डिसेंबर रोजी बलभीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

कुद्रेमानी (ता. बेळगाव)येथे बलभीम साहित्य मंडळामार्फत होणाऱ्या  मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत बोलताना रवी पाटील व इतर.
मजरे कार्वे / प्रतिनिधी
कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बालभीम साहित्य संघ यांच्यावतीने १४वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन  रविवार  दिनांक 22 डिसेंबर 2019 रोजी  कुद्रेमानी हायस्कूल च्या प्रशस्त प्रांगणात कै. परशराम मिनाजी गुरव साहित्य नगरी येथे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष दत्ता कांबळे होते. श्री बलभीम  साहित्य संघाच्या कार्यालयांमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागांमध्ये आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील हे कुद्रेमणी गाव असून एक शिस्तबद्ध नियोजनबद्ध साहित्य संमेलन निटनेटक आयोजन केलं जातं. असं खास वैशिष्ट्य आहे. रवी पाटील  यांनी बोलताना म्हणाले, माता, माती आणि  साहित्याचा जागर ,ही साहित्याची पालखी सीमाभागात माय मराठी भाषा , संस्कृती, परंपरा जोपण्यासाठी ही साहित्य संमेलन प्रेरणास्थान  आहेत आणि म्हणून हा मराठीचा समाजात होणारा जागर साहित्य संघाच्या माध्यमातून ही साहित्याची मांदियाळी नवोदित कवी, लेखक निर्माण व्हावेत .  साहित्य संमेलन  यावर्षी सुद्धा निटनेटके, नियोजनबद्ध व वैशिष्टयपूर्ण यशस्वी करण्यासाठी नियोजना संदर्भात चार सत्रात संमेलन भरविण्यासाठी साहित्य संघाने पुढाकार घेतलेला आहे.
या वर्षी पासून 'बलभीम काव्यपुरस्कार ' देण्याचा जाहिर करत आहे. अशी माहिती प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.
यावेळी संघाचे पदाधिकारी व ग्रा.पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी ही बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले , साहित्य हा समाजाचा आरसा असून मराठी भाषा समृद्ध व्हावी व साहित्यिक निर्माण व्हावे ही साहित्य संघाची तळमळ आहे. यावेळी जी. जी.पाटील, गणपत धामणेकर, पत्रकार व कवी शिवाजी शिंदे, एम.बी.गुरव नियोजनबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला राम गुरव , शिवाजी मुरकुटे , बाबाजी गुरव , प्रकाश गुरव , राजाराम राजगोळकर , शांताराम गुरव यासह सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment