गरम पदार्थ प्लास्टिक मधून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका - डॉ. प्रसन्न एन. चौगुले - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2019

गरम पदार्थ प्लास्टिक मधून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका - डॉ. प्रसन्न एन. चौगुले

कोवाड येथे पोषण आहार अभियान अंतर्गत विविध उपक्रम
कोवाड येथे सही पोषण देश रोशन कार्यक्रमांतर्गत जनजागृती फेरी.
कोवाड / प्रतिनिधी
खाद्य पदार्थांचा संपर्क प्लास्टिक शी आल्यास कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. आज प्रत्येक गावात पंचवीस-तीस कॅन्सरचे रुग्ण आहेत हे त्याचेच द्योतक आहे. असे प्रतिपादन कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न एन. चौगुले यांनी केले ते कोवाड येथे चंदगड तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग आयोजीत सही पोषण देश रोषण अभियान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. श्रीराम विद्यालयाचे प्राचार्य एन.एन.मणगुतकर, डॉ. स्वाती विचारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. स्वागत अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती आर जी चव्हाण यांनी केले. प्रस्ताविक सौ संगीता पाटील यांनी केले. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर चौगुले म्हणाले अनियमित आहार शारीरिक, बौद्धिक, मानसिक आजारांचे मूळ आहे. त्यामुळे नियमित सकस आहार घ्या. चायनीज  व  फास्टफूडच्या नादी लागू नका. कडधान्य तशीच खाण्यापेक्षा त्यांना मोड आणून खाल्यामुळे अनेक फायदे आहेत. यावेळी त्यांनी प्लास्टिक बंदी सह कुष्ठरोग,क्षयरोग, असांसर्गिक रोग सर्वेक्षण बाबत माहिती दिली. प्राचार्य मनगुतकर, आहार तज्ञ डॉ. स्वाती विचारे यांनी आरोग्य व स्वच्छता विषयक मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र शाळा कोवाडच्या चौथीतील विद्यार्थिनींनी काढलेल्या रांगोळीचे तसेच कोवाड बीड मधील अंगणवाडी सेविकांनी बनवलेल्या सकस आहार पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमानंतर बाजारपेठेतून  हातात घोषणा फलक घेऊन  जनजागृती रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आरोग्य सहाय्यक जी व्ही चव्हाण, एन सी घोडे, एस.डी. वाघमारे, यु एम साबखान, एन. पी. रजपूत आरोग्य सहाय्यिका एस व्ही नाईक, आर.एस साळोखे, महिला बचत गट समूह साधन व्यक्ती कविता रामा यादव व भारती पुंडलिक चोपडे आदींसह कोवाड बिट मधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, श्रीराम विद्यालय मधील विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका कविता पाटील यांनी केले. आभार अंगणवाडी सेविका वनिता खाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment