कुदनुर ओढ्यानजीकचा रस्ता बनलाय म्रुत्युचा सापळा - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2019

कुदनुर ओढ्यानजीकचा रस्ता बनलाय म्रुत्युचा सापळा

कागणी- हत्तरगी मार्गावर कुदनूर नजिक ओढ्याच्या प्रवाहामुळे तुटून गेलेला रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री ते कुदनुर (ता. चंदगड) गावा दरम्यान वाहणाऱ्या किटवाड ओढ्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्ता खचल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुक सुरक्षित करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
 गेल्या तीन-चार वर्षातील जोरदार पावसामुळे तसेच किटवाड नजिकची दोन्ही धरणे ओव्हर फ्लो झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे रस्ता दरवर्षी खचत चालला आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ता आणखी धोकादायक बनला आहे. ओढ्याचे पात्र डांबरी रस्त्यापर्यंत येऊन ठेपले आहे. गडहिंग्लज, कोवाड-बेळगाव मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावरून कागणी, कालकुंद्री, कुदनुर ते राजगोळी, दड्डी, हत्तरगी, कोल्हापूर जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. रोज सुमारे पंचवीस तिस एसटी बस व शेकडो लहान मोठी वाहने धावत असतात. रस्ता तुटून गेल्यामुळे ही सर्व वाहतूक धोकादायक बनली आहे रात्रीच्या वेळी किंवा समोरासमोर दोन वाहने आल्यास धोक्याची तीव्रता आणखी वाढत आहे. याठिकाणी कोणताही मोठा अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्यापूर्वी संबंधित बांधकाम विभागाने तसेच पाटबंधारे विभागाने पाहणी करून रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करण्यासाठी उपाय योजना करावी अशी मागणी प्रवासी वाहनधारक व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे. 

No comments:

Post a Comment