मुरकुटेवाडी येथे नवरात्रोत्सव सोहळ्याला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2019

मुरकुटेवाडी येथे नवरात्रोत्सव सोहळ्याला प्रारंभ

मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील दुर्गामातेची मुर्ती.
चंदगड / प्रतिनिधी   
मुरकुटेवाडी येथील सार्वजनीक दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळामार्फत दुर्गामाता व नवरात्रोत्सवला प्रारंभ झाला.रविवार दि.२९ रोजी दुर्गामाता मिरवणुक व प्रतिष्ठापना करण्यात आली. दररोज सकाळी व संध्याकाळी ७:३० वाजता आरती व प्रसाद होणार आहे.तसेच रविवार दि.२९ सप्टेंबर  ते बुधवार दि.९ ऑक्टोबर पर्यंत दांडीया नृत्य,व्याख्याने,मनोरंजन कार्यक्रम,संगीत भजन,हळदी-कुंकू,आरोग्य शिबिर,होमहवण ई.कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.मंगळवार दि.८ रोजी आरती,पुजा,घट हलविणे व विसर्जन मिरवणूक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान शशिकांत पेडणेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment