माझ्या लोकांसाठी, कार्यकर्त्यासाठी मी अपक्ष लढणार – अनिरुध्द रेडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2019

माझ्या लोकांसाठी, कार्यकर्त्यासाठी मी अपक्ष लढणार – अनिरुध्द रेडेकर

गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज
अनिरुध्द रेडेकर
चंदगड / प्रतिनिधी
मी माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत केली आहे. जनतेसाठी मी प्रसंगी 24 तास काम केले आहे. कार्यकर्त्यांची मागणीनुसार मी लढण्याचे निश्चित केले आहे. चंदगड मतदारसंघासाठी शिवसेनेतून निवडणुक लढविण्यासाठी मी पक्षाकडे तिकीटाची मागणी केली होती. मात्र रविवारी शिवसेनेकडून चंदगड मतदारसंघासाठी संग्राम कुपेकरांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व लोकांसाठी मी अपक्ष उभा राहून चंदगड मतदारसंघातून निवडणुक लढणार असल्याचे केदारी रेडेकर फौडेशनचे उपाध्यक्ष अनिरुध्द रेडेकर यांनी सांगितले. 
ते पुढे म्हणाले, ``मी ज्यांना मदत करतोय, ज्यांना मदत करतोय, त्यांच्या इच्छेसाठी मी विधानसभा निवडणुक लढवणार आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून जायचे आहे. त्यासाठी मी निवडणुक रिंगणात उतरत आहे. मी चोविस तास लोकांसाठी काम करणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी थांबणार नाही. मी तरुण आहे. त्यामुळे तरुणांच्यासाठी मी आतापर्यंत बरेच काम केले आहे. तरुणांना माझे विचार पटतात. मतदारसंघात चाळीस टक्याहून अधिक संख्या तरुणांची असून त्यांची मला मदत मिळणार आहे. तरुण पिढीला तरुण चेहरा हवा आहे. कारण मी कोणालाही मदत करताना कधीही राजकारण बघितले नाही. त्यामुळे मला सर्वपक्षीय मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.``
मी आतापर्यंत कोणालाही दुखावले नसल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ``माझे चारित्र्य स्वच्छ आहे. त्यामुळे कोणीही माझ्यावर कसलाही आरोप करु शकत नाही. मी विविध प्रकारच्या कामासाठी महिन्यातून अनेकदा मंत्र्यालयापर्यंत फेऱ्या मारुन कामे करुन घेतली आहेत. निधी खेचून आणून चंदगड मतदार संघाचा विकास करणार आहे. माझ्याकडे काहीही नसताना मी लोकांना मदत करतोय. तरुणांच्या मनात स्थान मिळविण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या जोरावरच मी त्यांच्याकडे मदत मागणार आहे. मी कामांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे त्यांची मला मदत होणार असल्याचे श्री. रेडेकर यांनी सांगितले. 



1 comment:

Unknown said...

Mi khas tumchyasathi yenar matdan karayla

Post a Comment