![]() |
नागरदळे येथील जय दुर्गामाता युवक मंडलाने आयोजित केलेल्या हळदी कुंकु समारंभ कार्यक्रमात बोलताना प्रा. दिपक पाटील. |
भारतीय समाजामध्ये अनेक वर्षे स्त्रियावर अनेक प्रकारची बंधने ही याच सामाजाद्वारे घातली गेली होती.सतीची चाल,विधवांचे केशवपन अश्या अनेक प्रकारच्या अनिष्ठ चालीरितीने वर्ष्यानो वर्षे स्त्रियावर अन्याय हां होत आलेला होता.ते दूर करण्याचे काम राजा राम मोहन रॉय,महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य टिळक यासारख्या अनेक समाजसुधारकानी केले असून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीयांना समानता ही देण्यात आली असून या पुढील काळात स्त्रियांना आर्थिक दृष्ठ्या सक्षम केल्यास आपला देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखु शकणार नाही, असे प्रतिपादन प्रा. दीपक पाटील यानी नागरदळे येथील जय दुर्गामाता युवक मंडलाने आयोजित केलेल्या हळदी कुंकु समारंभ कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी मंडळाचे अध्यक्ष सुबराव पाटील हे होते.
प्रास्ताविक अजित पाटील यानी केले.प्रा. दीपक पाटील महिलांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले,आजच्या स्पर्धेच्या युगात महिलानी बचत गटाच्या माध्यमातुन एकत्र येऊन आपली आर्थिक प्रगति ही साधली पाहिजे.कोणताही उद्योग हां कमी न मानता प्रत्येक उद्योग हां मनापासून स्वीकारला पाहिजे,उदाहरण देताना ते पुढे म्हणाले की,लिज्जत पापड सारखा उद्योग हां केवळ 7 महिलांच्या मधून सुरु होउन आज रोजी एकुन या उद्योगा मार्फत 45,000 महिला स्वावलंबी बनल्या आहेत.त्यांमुळे ग्रामीण भागातील महिलानी पापड,शेवया, लोनचे यासारखे उद्योग स्वीकारने आणि आपली प्रगती साधने ही आजची काळाची गरज आहे.त्यासाठी महिला मोठ्या संखेने एकत्र येऊन प्रयत्न होने गरजेचे आहेत.यावेळी प्रियांका पाटील, लक्ष्मीबाई पाटील,सागर हदगल,विश्वनाथ पाटील, सागर सोनार,संदीप देवन,कृष्णा मनंगुतकर यांच्या सह महिला वर्ग हा लाक्षणिक संखेने उपस्तित होता,शेवटी व्हन्याळकर सर यानी आभार मानले.
No comments:
Post a Comment