केंद्र शाळा कोवाड येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फोटो पूजन करताना मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी तर देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११६ वी जयंती उत्साहात पार पडली.
मुख्याध्यापक श्रीकांत वै.पाटील यांच्या हस्ते दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी भाषणात दोन्ही विभूतींच्या जीवन कार्याचा आढावा घेताना त्यांच्या जीवनावरील महत्त्वपूर्ण घटना व प्रसंग ही सांगितले. यावेळी विद्यार्थी ऋतुजा परसराम भोगण, हर्षदा अजित होण्याळकर, सुमंगल शंकर शिरूर, पियुशा रामा यादव, वेदांती संतोष सुर्यवंशी आदींनी भाषणे केली. स्वागत गणपती लोहार यांनी तर प्रस्ताविक मधुमती गावस यांनी केले. यावेळी भावना अतवाडकर, उज्वला नेसरकर, कविता पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका रमेजा मुल्ला, मोहिनी पाटील, चंद्रभागा पाटील, अनुराधा खोराटे व सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार श्रीकांत आ. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment