शिवाजी पाटील यांची नेव्ही दलात कमांडरपदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2019

शिवाजी पाटील यांची नेव्ही दलात कमांडरपदी नियुक्ती

तेऊरवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
शिवाजी पाटील

तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील शिवाजी नारायण पाटील यांची भारतीय नेव्ही दलात कमांडर ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. चंदगड तालूक्यामध्ये भारतीय सैन्यदलात सर्वाधिक जवान असलेले गाव म्हणून तेऊरवाडीचा नावलौकीक आहे. यामध्येच शिवाजी पाटील यांची आर्मीतील लेप्टन कर्नल या पोस्टबरोबर असणाऱ्या नेव्हीतील कमांडर पदावर नियुक्ती झाल्याने तेऊरवाडी गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तेऊरवाडी येथे एकाच कुटूंबातील सैन्यदलात सेवा केलेले व करत असलेले वडिल नारायण (निवृत्त), शिवाजी (नेव्ही), संभाजी (निवृत्त) व दयानंद (एमसी). 
सरकारी दरबारी कोरडवाहू गाव म्हणून तेऊरवाडीची नोंद जशी आहे. तशी सर्वाधिक सैन्यदलात जवान असलेलेले गाव म्हणूनही नोंद आहे. कारगिल युद्धामध्ये येथील लक्ष्मण वैजू भिंगुडे या जवानाने पराक्रम गाजवला आहे. येथे घरोघरी जवान आहेत. शिवाजी पाटील यांचे संपूर्ण घरच सैन्यदलात आहे. वडील नारायण पाटील सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत, तर त्यांची तिनही मूले शिवाजी नेव्हीमध्ये अंदमान -निकोबार येथे कमांडर म्हणून, दोन नंबरचा मुलगा संभाजी सैन्यदलात 22 वर्ष सेवा करून हवालदार म्हणून निवृत्त झाले आहेत. तिसरा मुलगा दयानंद आर्मिमध्ये एमसी विभागात रांची येथे कार्यरत आहे. शेतकरी कुटुंबात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या या पाटील कुटुंबाने देशसेवेसाठी चार जवान दिल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. मराठी तरूणानी मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता स्पर्धा परिक्षाना सामोरे गेले तर यश निश्चित मिळते. सैन्य दलाच्या माध्यमातून देशाची सेवा केल्याचा आनंद हा सर्वश्रेष्ठ असून तो मिळवायचा असेल तर युवकानी कठोर परिश्रम करणे गरजेचे विचार कमांडर शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले.

1 comment:

Unknown said...

सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

Post a Comment