डुक्करवाडी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2019

डुक्करवाडी विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

महात्मा गांंधी
चंदगड / प्रतिनिधी 
चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मुख्याध्यापक एस. एम. कांबळे यांनी प्रतिमा पूजन करून थोर नेत्यांना अभिवादन केले. यावेळी साहिल वरपे, सोनाली गावडे, तेजस पाटील, शैलेश मुळीक, सायली बोकडे या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषेतून या थोर नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षक  एम. एन. शिवणगेकर, अशोक पाटील, प्रशांत मगदुम यांनी या थोर नेत्यांच्या कार्याची माहिती विशद केली. यावेळी प्लॅस्टीक मुक्ती व स्वच्छतेची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे राजेंद्र शिवणगेकर यांनी सुत्रसंचालन  व आभार मानले. 

No comments:

Post a Comment