|  | 
| कार्वे येथे प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करताना प्रा . आर .पी. पाटील सोबत एम एम तुपारे , पी एम .ओऊळकर | 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळ कोल्हापूर यांचे मार्फत चंदगड तालूक्यातील इयत्ता नववी व दहावी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाना सुधारित मूल्यमापन आराखडा प्रशिक्षण देण्यात आले . आज झालेल्या इंग्रजी व भूगोल प्रशिक्षण वर्गाचे उट्घाटन खेडूत शिक्षण मंडळाचे सचिव आर .पी. पाटील यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एस .वाय. कुंभार होते .
विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थी विद्यार्थिनिना यंत्रे सर्व ज्ञान देऊ शकत नाहीत . पण शिक्षक हावभावांच्या आधारे विद्यार्थांना परिपूर्ण ज्ञान देत असतो .बदलत्या समाज व्यवस्थेच्या अग्रस्थानी शिक्षक असल्याने अशा शिक्षकाना अद्यावत प्रशिक्षणे गरजेची असल्याचे विचार आर.पी. पाटील यानी यावेळी बोलताना व्यक्त केले . या प्रशिक्षण वर्गाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून पी एम .ओऊळकर , एम.एल. कांबळे , ०ही .एन. देसाई , पी .व्ही. सुतार यानी इंग्रजी विषयाचे अत्यंत सखोल असे  सविस्तर मार्गदर्शन केले . तर भूगोल विषयाचे सुहास  पाटील , एन.एल. कांबळे यानी मार्गदर्शन केले . या प्रशिक्षण वर्गाला चंदगड तालूक्यातीत सर्व माध्यमिक शाळातील शिक्षक उपस्थित होते . 
 

 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment