हिंदी भाषेतील समृध्द साहित्य व्यक्तीमत्व विकासाला पोषक – व्यवस्थापक अमित मिश्रा - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2019

हिंदी भाषेतील समृध्द साहित्य व्यक्तीमत्व विकासाला पोषक – व्यवस्थापक अमित मिश्रा


चंदगड / प्रतिनिधी
हिंदी हि सुलभ भाषा आहे. हिंदी भाषेत विलक्षण गोडवा आहे. या भाषेतील समृध्द साहित्याचे वाचन व्यक्तीमत्व विकासास पोषक आहे. हिंदी हि केवळ ज्ञानभाषा नसून जनसामान्यांची प्रभावी अभिव्यक्ती करणारी भाषा आहे. अन्य भाषिकांनी सातत्यपुर्ण सरावाने आपली राष्ट्रभाषा आत्मसात करुन या भाषेचा यशोचित सन्मान करावा असे प्रतिपादन चंदगड येथील बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अमित मिश्रा यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित हिंदी दिन सप्ताहात भाषाज्ञान व रोजगाराच्या संधी या विषयावर बोलत होते. 
प्रारंभी मधुशाला या भित्तीपत्रकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. डा. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची शिक्षकांची जबाबदारी आहे. व्यक्तीमत्व विकास आवश्यक कौशल्ये प्राप्त करुन विद्यार्थ्यांनी राष्ट्रभाषा हिंदीतील साहित्य वाचन करावे व रोजगाराचे विविध मार्ग शोधावेत असे सांगितले. हिन्दी विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. हिंदी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रतीक्षा शिरगावकर, शिवानी पवार, डॉ. एन. एस. मासाळ यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी प्रा. दीपक कांबळे, अनिल पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. तैजिबा नाईक हिने सूत्रसंचालन केले. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment