हिंदी भारत माता की बिंदी है- प्रा. खरुजकर - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2019

हिंदी भारत माता की बिंदी है- प्रा. खरुजकर


चंदगड / प्रतिनिधी
स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची भाषा हिंदी होती. स्वातंत्र्यानंतरही देशात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी हीच भाषा आहे. दैनंदिन व्यवहारात, शाळा, महाविद्यालय, कार्यालय, आँफीस, संस्था, व्यापार व उद्योग क्षेत्रात हिंदी भाषा वापरली जाते. तेव्हा "हिंदी भाषा देश की बिंदी है" मात्र ही भाषा राष्ट्रभाषेच्या आसनावर बसविताना राजकीय उदानसिता दिसून येत असल्याचे सांगून प्रा. एस. एन. खरुजकर यांनी हिंदी भाषेचा सन्मान केला पाहिजे असे मत व्यक्त केले. ते हिंदी दिनानिमित्त हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य जी. व्ही. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमात व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. वाय. निंबाळकर होते. त्यांनी हिंदी भाषा जगात मोठ्या प्रमाणात बोलली जगते. हिंदी भाषेचा बोलताना प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे असे व्यक्त केले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. व्यासपीठावर दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ. मधुकर जाधव, कमलेश जाधव आदी उपस्थित होते. कु. दिपाली पाटील हिने सुत्रसंचालन केले. प्रा. आर. बी. गावडे आभार मानले. 

No comments:

Post a Comment