चंदगड विधानसभा मतदारसंघातून आज 13 उमेदवारांनी दाखल केले 18 अर्ज - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2019

चंदगड विधानसभा मतदारसंघातून आज 13 उमेदवारांनी दाखल केले 18 अर्ज

चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार अर्ज दाखल करताना भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे व इतर.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी आजच्या सातव्या दिवशी 13 उमेदवारांनी 18 अर्ज दाखल केले. आज दिवसभरात भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. वंचित आघाडीतून गंगाधर व्हसकोटी यांनी एक, शिवाजी पाटील यांनी भाजपमधून एक अर्ज, अमर चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक अर्ज, जनता दलातून स्वाती कोरी व बाळेश नाईक यांनी प्रत्येकी एक, श्रीकांत कांबळे यांनी बसप म्हणून एक अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे राज्य कार्यकारीणी सदस्य गोपाळराव पाटील, केदारी रेडेकर फौंडेशनचे उपाध्यक्ष अनिरुध्द रेडेकर, आप्पासाहेब भोसले, शिवप्रसाद तेली, अमर चव्हाण, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, भाजपचे शिवाजी पाटील, गंगाधर व्हसकोटी, सुभाष देसाई यांनी अपक्ष दोन अर्ज दाखल केले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांच्याकडे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांचा अर्ज भरताना शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे, संभाजी पाटील, दिलीपराव माने, दिगंबर देसाई यांच्या सह भाजपा पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान काल रमेश रेडेकर व त्यांच्या पत्नी सौ. सुमन रेडेकर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे चंदगड मतदारसंघात आतापर्यंत 15 व्यक्तींनी 20 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सद्याच्या उमेदवारी अर्जावरुन मतदारसंघात उमेदवारांची संख्या गतवर्षीच्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसते. याबाबत अर्ज माघारीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. 
चंदगड शहरातून रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपचे शिवाजी पाटील व कार्यकर्ते. 
                                                    शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
भाजपचे शिवाजी पाटील यांनी चंदगड बाजारपेठेतून शक्तीप्रदर्शनाने हजारो कार्यकर्त्यांसह जावून चंदगड ग्रामदैवत रवळनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी विजया पांगाकर यांच्याकडे आपला उमेदवार अर्ज भाजपमधून एक व अपक्ष एक असे दोन अर्ज भरले. ब्लॅक पॅंथरचे सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरला. 

No comments:

Post a Comment