हलकर्णी महाविद्यालयात वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2019

हलकर्णी महाविद्यालयात वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा

हलकर्णी (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह 2019 चा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला पाटणे वनक्षेत्राचे प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी वन व वन्यजीव विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एल. निंबाळकर होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख. प्रा. घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला वनपाल बी. आर. भांडकोळी, पी. एम. धामणकर, वनरक्षक एस. एस. पाटील, एस. एस. जीतकर, एम. आय. सनदी यांच्यासह कर्मचारी व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment