भरमू पाटील, विनायक पाटील व राजेश पाटील यांचे शक्तीप्रदर्शन
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी 36 नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर आजअखेर चंदगड मतदारसंघासाठी 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले आहे. यातील 8 उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत.
चंदगड मतदारसंघात विक्रमी अर्ज दाखल झाल्याने यावरुन सद्यातरी बहुरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशीच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सद्या भाजमध्ये असलेले माजी राज्यमंत्री भरमू पाटील, वंचित बहुजन आघाडीचे विनायक पाटील व नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवारी मिळविलेल्या राजेश पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापू लागले आहे. अर्ज दाखल करण्याऱ्याची संख्या मोठी असल्याने तसेच एकास-एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने काहींना माघारीसाठी विनवणी करावी लागणार आहे.
दरम्यान आज चंदगड विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीतून संग्राम कुपेकर यांना दिली आहे. याच मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर हे इच्छुक होते. त्यामुळे आज खांडेकर यांनी पक्षांशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनायक पाटील यांना एबी फॉर्म मिळाल्याने त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांची कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी निवडणुक लढविण्याबाबत वेगवेगळी भुमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. याच दरम्यान राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून उमेदवारीबाबत चर्चा केली होती. राष्ट्रवादीच्या चंदगड विधानसभेच्या उमेदवारीबाबत खबलते होवून शेवटी राष्ट्रवादीची उमेदवारी राजेश पाटील यांना मिळाली. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करुन तर्कविर्तकांना पुर्णविराम दिला.
आज अखेरच्या दिवशी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये – संतोष पाटील (अपक्ष), मारुती पाटील (अपक्ष), प्रकाश रेडेकर (अपक्ष), भरमु पाटील (अपक्ष दोन अर्ज), प्रकाश बांदिवडेकर (अपक्ष), ज्योती पाटील (अपक्ष), रामचंद्र कांबळे (अपक्ष), नामदेव सुतार (अपक्ष), राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन अर्ज), बाळाराम फडके (अपक्ष), विनायक पाटील (वंचित बहुजन आघाडी), गोपाळराव पाटील (अपक्ष), प्रभाकर खांडेकर (अपक्ष), चंद्रु भोगुलकर (अपक्ष), नंदकुमार ढेरे (अपक्ष), ॲड. हेमंत कोलेकर (अपक्ष), धोंडीबा नाईक (अपक्ष), अशोक चराटी (जनसुराज्य शक्ती व अपक्ष), सुश्मिता पाटील (अपक्ष), विलास पाटील (अपक्ष), राजेंद्र गड्याण्णावर (स्वाभीमानी पक्ष व अपक्ष), महेश पाटील (अपक्ष).
- दरम्यान यापूर्वी गोपाळराव पाटील (अपक्ष), आप्पासाहेब भोसले (अपक्ष), शिवप्रसाद तेली (अपक्ष), अनिरुध्द रेडेकर (अपक्ष), अमर चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष), विद्याधर गुरबे (अपक्ष), शिवाजी पाटील (भाजप व अपक्ष), संग्राम कुपेकर (शिवसेना व भाजप दोन), गंगाधर व्हसकोटी (वंचित आघाडी व अपक्ष), स्वाती कोरी (जनता दल, (से)), सुभाष देसाई (अपक्ष दोन), श्रीकांत कांबळे (बहुजन समाज पार्टी), बाळेश नाईक (जनता दल, (से)), यांच्यासह रमेश रेडेकर (अपक्ष) व सुनिता रेडेकर (अपक्ष) यांनी चंदगड मतदारसंघासाठी अर्ज भरले आहेत.
No comments:
Post a Comment