चंदगड विधानसभा निवडणुकीच्या छाणनीमध्ये दोन अर्ज अवैध - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2019

चंदगड विधानसभा निवडणुकीच्या छाणनीमध्ये दोन अर्ज अवैध


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड विधानसभा निवडणूकीसाठी एकूण 46 अर्ज दाखल करण्यात आले होते. शनिवारी छाननीत दोघांचे अर्ज बाद ठरले. सुश्मिता राजेश पाटील व चंद्रु रवळु भोगुलकर यांचे असे दोघांचे अर्ज बाद झाले आहेत. तर अन्य पक्षाकडून भरलेले दोन अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे बाद झाले. त्यामुळे आता एकूण 34 उमेदवारांचे 42 अर्ज शिल्लक राहिले आहेत.
आज सकाळी अर्ज छाणनीवेळी भाजप कार्यकरणीचे सदस्य तथा अपक्ष उमेदवार गोपाळराव पाटील, शिवसेना-भाजप संग्रामसिंह कुपेकर,  उमेदवार माथाडी संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील, जनता दलाचे ॲड. श्रीपतराव शिंदे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा अपक्ष उमेदवार प्रभाकर खांडेकर, भाजप -अपक्ष उमेदवार रमेशराव रेडेकर, गोकुळचे संचालक दिपक पाटील, विद्याधर गुरबे,  गंगाधर व्हसकोटी  आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी विजया पांगारकर निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार विनोद रणवरे यांनी अर्ज छाननी प्रक्रिया पार पाडली. उमेदवारी अर्ज माघारी सोमवारी 7 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. आता अर्ज माघारीच्या दिवशी कोण-कोण माघार घेणार यावरुन लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवारांचे अर्ज राहीले तर दिग्गजांना डोकेदुखी ठरणार आहे. काही उमेदवार विजयापर्यंत नाही पोहोचले तरी दुसऱ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 2014 ला विधानसभेला उमेदवारांची संख्या 18 होती. उमेदवारांची संख्या पाहता यावेळी दोन एव्हीएम मशीन लावाव्या लागणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यासाठी निवडणुक प्रक्रिया वेळखाऊ होणार आहे.


No comments:

Post a Comment