![]() |
कलिवडे (ता. चंदगड) धनगरवाड्यावरील अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या सौ. सोनुबाई जानकर यांना वनविभागाकडून मिळालेला धनादेश देताना पाटणे विभागाचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील व इतर कर्मचारी. |
अस्वलाच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या कलिवडे (ता. चंदगड) धनगरवाड्यावरील सौ. सोनुबाई धावु जानकर या महीलेला आज पाटणे वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी वनविभागाकडून मिळालेला एक लाख रूपयांचा धनादेश त्यांच्या घरी जाऊन दिला. यापूर्वी सौ. जानकर यांना तातडीची पंचवीस हजार रुपये दिली होती.
सौ. जानकर यांच्यावर 21 सप्टेंबर 2019 रोजी अस्वलाने अचानक हल्ला केला होता. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना चंदगड येथे प्राथमिक उपचारानंतर गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान शनिवारी वनविभाग पाटणेचे वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी जानकर यांच्या घरी जाऊन एक लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यापूर्वी तातडीची रोख पंचवीस हजार रुपये देण्यात आली होती. यावेळी वनपाल बी. आर. भांडकोळी, अमोल शिंदे, डी. एस. रावळेवाड, एस. एम. पाटील व वनसेवक पुंडलिक नागुर्डेकर, विश्वनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment