महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर चंदगड विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2019

महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर चंदगड विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज

संग्राम कुपेकर
चंदगड / प्रतिनिधी
शिवसेना, भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघाचे संघटक संग्राम कुपेकर गुरुवारी (ता. 3) चंदगड विधानसभा मतदारसंघातून सकाळी नऊ वाजता अर्ज भरणार आहेत. चंदगड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला आहे. गुरुवारी श्री. कुपेकर यांचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हा संघटक बाबा देसाई, हिंदुराव शेळके यांच्यासह शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित रहाणार असल्याचे समजते.



No comments:

Post a Comment