चंदगड विधानसभात मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात, 20 जणांची माघार - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2019

चंदगड विधानसभात मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात, 20 जणांची माघार


चंदगड / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यापासुन चंदगड मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. महायुती व आघाडी या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी देतानाही सर्व काही जर-तर वर अवलंबून राहिले. त्यामुळे या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. चंदगड मतदारसंघात 36 उमेदवारांनी 46 अर्ज भरले होते. त्यापैकी 34 उमेदवारांचे 42 अर्ज छाननीनंतर शिल्लक राहिले.  आज अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल 20 उमेदवारांनी माघारी घेतल्याने 14 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुक रिंगणात राहिले. या 14 जणांच्यामध्ये लढत होणार असल्याचे मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या 14 उमेदवारांच्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी निवडणुक निकालाची वाट पहावी लागणार आहे.

                                              निवडणुक रिंगणातील 14 उमेदवार
शिवसेना-भाजप महायुतीचे संग्रामसिंह भाग्येशराव देसाई (कुपेकर), काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नरसिंगराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे विनायक विरगोंडा (अप्पी) पाटील, अपक्ष उमेदवार शिवाजी शटुप्पा पाटील, रमेश दत्तु रेडेकर, सुभाष वैजु देसाई, श्रीकांत अर्जुन कांबळे, अनिरुध्द केदारी रेडेकर, आप्पासाहेब बाबुराव भोसले, संतोष कृष्णा पाटील, प्रकाश रामचंद्र रेडेकर, नामदेव बसवंत सुतार, अशोक काशिनाथ चराटी, महेश नरसिंगराव पाटील.
                                                  माघार घेतलेले 20 उमेदवार
राजेंद्र शामराव गड्याण्णावर, अमरसिंह रामचंद्र चव्हाण, स्वाती महेश कोरी, गोपाळराव मोतीराम पाटील, गंगाधर बाळाप्पा व्हसकोटी, ज्योती दिपक पाटील, धोडीबा भागोजी नाईक, बाळेश बंडु नाईक, नंदकुमार पांडुरंग ढेरे, प्रकाश साताप्पा बांदिवडेकर, प्रभाकर मारुती खांडेकर, बाळाराम जोतीराम फडके, भरमु सुबराव पाटील, मारुती जोतिबा पाटील, रामचंद्र परशराम कांबळे, विदयाधर बाबुराव गुरबे, विलास भावकु पाटील, शिवप्रसाद आप्पासाहेब तेली, सुनिता रमेश रेडेकर, हेमंत तुकाराम कोलेकर.

No comments:

Post a Comment