![]() |
नांदवडे (ता. चंदगड) येथे दिवाळीनिमित्त एकत्र कडु खाण्यासाठी जमलेले शिंदे घराण्यातील पुरुष मंडळी. |
पुर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पध्दती होती. त्यावेळी एकीच्या बळामुळे अनेक कामे सहजगत्या होत होती. तंत्रज्ञानाच्या युगात माणसे आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळ येत असली तरी माणसा-माणसातील संवाद संपत चालला आहे. याच्या परिणामामुळे लोकांच्यामध्ये दुरावा वाढत असून त्यामुळे विभक्त कुटुंब पध्दती झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकजण आपण स्वतंत्र राहण्यासाठी धडपडत असतो. एखाद्या कार्यक्रमाला अनेकदा बोलावूनही लोक येत नाहीत. या सर्व गोष्टींना छेद देत नांदवडे (ता. चंदगड) येथील शिंदे घराण्याने आजही दिवाळीमध्ये एकत्र कडु खाण्याची परंपरा गेली 150 वर्षे ते जोपासत आहेत. या घराण्यातील सत्तरहून अधिक पुरुष मंडळी या दिवशी एकत्र येतात. गेल्या वर्षभरामध्ये घराण्यातील ज्या मुलींचा विवाह होतो. त्यांना त्यावर्षीच्या कडु खाण्याच्या दिवशीचा ओवाळणीचा मान दिला जातो. अशी या घराण्याची परंपरा आजही टिकून आहे. एकमेकाच्या घराला घर लागून असतानाही शेजारी काय चालले आहे. याकडे लोक दुर्लक्ष करतात. मात्र या शिंदे घराण्यांने आज तिसऱ्या पिढीपर्यंत हि परंपरा जपली आहे. त्यांनी जोपासलेली परंपरा कौतुकाला पात्र आहे.
No comments:
Post a Comment