पाटणे फाटा येथे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

27 October 2019

पाटणे फाटा येथे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी 
पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेकरिता चंदगड तालुक्यातील व्हि.के.चव्हाण -पाटील महाविद्यालय पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे सोमवार २८ ऑक्टोबर 2019 रोजी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराला राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत .सकाळी ९ ते २ या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत परीक्षेला असलेल्या अभ्यासक्रमात विषयानुसार परीक्षेची तयारी कशी करावी ,गणिते सोडविण्याचे उपयुक्त  तंत्र ,कमी वेळेत दर्जेदार अभ्यास कसा करावा. आणि मार्गदर्शनासाठी कोणती पुस्तके अभ्यासावीत याबाबत माहिती दिली जाणार आहे. सदरचे प्रशिक्षण मोफत असून पोलिस कॉन्स्टेबल परीक्षेची तयारी  करत असलेल्या चंदगड ,आजरा ,गडिंग्हलज तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्राचार्य,व्हि.के.चव्हाण -पाटील यांनी  कळविले आहे.

No comments:

Post a Comment