![]() |
चंदगड शहरात पडणाऱ्या पावसामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. |
चंदगड / प्रतिनिधी
शहर परिसरात आज दिवसभर पावसाची संततधार सुरुच आहे. सकाळच्या सत्रात मुसळधार तर दुपारनंतर पावसाचा काहीसा जोर ओसरला. मात्र या संततधार पावसामुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. त्यामुळे लहान मुले व वयोवृध्द लोकांच्या आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. पावसाच्या संततधारेमुळे महापुराच्या तडाख्यातून उरलीसुरळी पिकेही या संततधार पावसामुळे जमीनदोस्त होत आहेत. संततधार पावसामुळे नद्याच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उद्यापर्यंत पावसाची जोर असाच राहिल्यास पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापुराच्या काळात निम्याहून अधिक पिके कुजून लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला होता. आता या परतीच्या पावसानेही झोडपल्याने उरलेली पिकांमध्ये पाणी शिरल्याने परिपक्व झालेली पिके जमीनदोस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळे पाणावत आहेत. बळीराजा पाऊस थांबण्यासाठी देवाकडे साकडे घालत आहे.
No comments:
Post a Comment