संकोचित विचार झुडकारून कष्ट करण्याची तयारी ठेवा- अनंत पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

25 October 2019

संकोचित विचार झुडकारून कष्ट करण्याची तयारी ठेवा- अनंत पाटील

साहित्य रत्नच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अनंत पाटील, शेजारी संंजय पाटील एम. एम. तुपारे आदी.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
स्वतःला ओळखून जगण्याचा प्रयत्न करा.स्वतःला वलयांकित न करता गाववेस ओलांडून जगाच्या दिशा फिरा. यश हाती नाही तोपर्यत जिंकणे नसते. परिस्थितीला भिडायला शिका.तसेच संकोचित विचार झुडकारून कष्ट करण्याची तयारी ठेवा असे प्रतिपादन अनंत पाटील यांनी केले. चंदगड येथे साहित्य रत्नं आयोजित नोकऱ्या नाहीत म्हणून..!!विषयाला अनुसरून ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
नोकरी नसल्या नैराश्यातून चंदगडची तांबडी असलेली माती वाईट कृत्याने अजून लाल करू नका अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. संजय साबळे म्हणाले की, ``उदात्त ध्येय आणि संधीचे सोने करता आला पाहिजे. गांभीर्य ओळखून जो जगला तो इथे टिकला.``  यावेळी सकारात्मक दृष्टिकोन व चांगले विचार आपल्या यशाचा मार्ग सोपा करतात असे प्रा. नंदकुमार पाटील यांनी सांगितले. कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते असे मत भरतकुमार बोंगाळे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात एम. एम. तुपारे यांनी आजच्या जगाचे वास्तव तरूणांसमोर मांडले. यावेळी समुहाचे अरूण चिंचणगी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक कार्तिक पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रमोद चांदेकर यांनी करून दिला. राहुल गवस यांनी सुत्रसंचालन केले. कृष्णा पाटील यांनी आभार मानले.  या कार्यक्रमाला कमलेश जाधव, अशोक दळवी, एकनाथ कांबळे, अक्षय लांडे, जोतिबा गुरव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment