निट्टूर प्रकल्पातील पाण्याचा जपून वापर करा - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2019

निट्टूर प्रकल्पातील पाण्याचा जपून वापर करा - आमदार राजेश पाटील

निट्टूर (ता. चंदगड) येथील तलाव क्र. २ च्या पाण्याचे पूजन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करताना सोबत सरपंच सुगंधा कुंभार , दत्तात्रय पाटील सुरेशराव पाटील व ग्रामस्थ.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात यावर्षी झालेल्या जोरदार पावसाने सर्वच लघू पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. सद्या प्रचंड प्रमाणात शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध असले तरी भविष्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन  आमदार राजेश पाटील यांनी केले. निट्टूर (ता. चंदगड) येथील लघु पाटबंधारे तलाव नं. 2 गेल्या १९ वर्षानंतर प्रथमच पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाच्या पाण्याचे पूजन तेऊरवाडी ग्रामस्थांकडून आमदार राजेश पाटील व सुरेशराव चव्हाण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, ``या निवडणूकीमध्ये धनशक्तीचा पराभव तर जनशक्तिचा विजय झाला आहे . माझ्या विजयाने जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे . त्यामूळे कोणताही भेदभाव न ठेवता  व कोणतेही राजकारण न आणता समाजातील सर्वच घटकांना बरोबरीने घेऊन विकासासाठी प्रयत्न करणार आहे . भविष्यात महायुध्दे झालीच तर ती पाण्यासाठीच होणार आहेत . त्यामुळे आतापासूनच पाणी आडवा , पाणी जिरवा व पाणी वाचवा हा विचार आमलात आणायला हवा . कै .व्ही.के. चव्हाण पाटील यांचे स्वप्न म्हणजे निटूरचा हा तलाव असून आज तो दोन तपानंतर पूर्ण भरला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे . याबरोबरच तलाव क्र .१ हा तलाव क्र .२ ला जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने यासाठी शेतकऱ्यानी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी बोलताना त्यानी केले.``
तेऊरवाडी गावच्या पाणीप्रश्नासाठी विनामूल्य जमिन दिली आहे . यापूढेही असेच सहकार्य असेल असे विचार सुरेशराव पाटील यानी व्यक्त केले. तेऊरवाडीच्या  विकासात  कैं .व्ही.के. चव्हाण पाटील व कै . नरसिंगराव पाटील यानी मोलाचे योगदान दिले आहे . तसेच योगदान राजेश पाटील यानीही देण्याचे आवाहन माजी सरपंच मारूती पाटील यानी केले . या कार्यक्रमाला सरपंच श्रीमती सुगंधा कूंभार , उपसरपंच सौ . शालन पाटील , निट्टू रचे सरपंच अमोल सुतार , उपसरपंच सचिन पाटील , पो . पाटील यल्लापा पाटील , प्रकाश पाटील , कोवाडचे उपसरपंच विष्णु आढाव , दत्तात्रय पाटील , राजू जाधव, मारूती पाटील , मारूती भिंगुडे , ग्रा. सदस्य राजेंद्र भिंगुडे , विठ्ठल पाटील , निर्मला कांबळे , माजी सरपंच सौ . शर्मिला पाटील , सौ .लिला पाटील , शेवंता पाटील , शोभा पाटील , संगीता पाटील यांच्यासह कोवाड , निट्टूर ,तेऊरवाडी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आर. जे. पाटील यानी केले. सुत्रसंचालन संजय गडकरी यानी तर आभार संजय पाटील यानी मानले.


No comments:

Post a Comment