वनविभाग अधिकाऱ्यांकडून पुरस्काराचे सन्मानचिन्ह स्वीकारताना बाबुराव वरपे. |
महाराष्ट्र शासन वनविभागमार्फत वृक्ष व पर्यावरण संवर्धनसाठी केलेल्या विशेष योगदानबद्दल "वृक्षमिञ पुरस्कार" बाबुराव वरपे (प्राथमिक शिक्षक) डुक्करवाडी, ता.चंदगड यांना पाटणे वनपरिक्षेञाचे वनअधिकारी डी.एच.पाटीलसो| यांचे हस्ते सन्मानित करणेत आले. वरपे हे गेली 25 वर्षे डुक्करवाडी-बागिलगे पंचक्रोशीतील शेतकरी,विद्यार्थ्यांना रोपवाटीकेच्या माध्यमातून काजू,फणस व इतर रोपे प्रतीवर्षी मोफत वाटून शासनाच्या वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन मोहीमेला मोलाचे सहकार्य केले आहे. "वृक्षरोपे आपल्या दारी" या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांना काजू,साग,फणस,नारळ,मसाल्याची रोपे मोफत घरी पोहोच करून प्रोत्साहीत केले आहे. मुलांच्या वाढदिवसाला प्रतीवर्षी रोपे वाटून पर्यावरण संवर्धन जागृती केली जाते.एकंदर आजपर्यंत केलेल्या हजारो वृक्षरोपांचे वाटप व वृक्षसंवर्धन, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांची पर्यावरणविषयक जाणिव जागृती .या सर्व बाबींची दखल घेवून श्री वरपे यांना सन्मानित करणेत आले.यावेळी वनपाल बी.आर.भांडकोळी, एन.एम.धामनकर, ए.डी.शिंदे, वनरक्षक एस.एस.पाटील, एस.एस.जितकर, डी.एम.बडे, एल.टी.मोहीते, ओ.जी.जंगम, जी.पी.वळवी, बी.बी.न्हावी, एम.आय.सनदी तसेच वनमजूर- नंदकुमार पाटील,शशिकांत शिंदे,नारायण पाटील,पुंडलिक नागुर्डेकर,मोनाप्पा मुतकेकर,अर्जून पाटील,लहू पाटील,चंद्रकांत बांदेकर,तुकाराम गुरव,मोहन तुपारे,विश्वनाथ नार्वेकर, शांताबाई कांबळे, संगणक आॅपरेटर पास्कल डिसोजा आदींसह कर्मचारी,मान्यवर,नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment