![]() |
सुंडी (ता. चंदगड) येथे स्नेहांकूुर माझी विद्यार्थी मेळाव्यावेळी उपस्थित मान्यवर. |
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित, संत तुकाराम हायस्कुल, सुंडी या ठिकाणी 29 अक्टोबर रोजी "स्नेहांकूर माझी विद्यार्थी मेळावा" पार पडला. १९८६-८७ पासून ते २०१८-१९ पर्यंतच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती. आजी, माजी विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सत्कारदेखील यावेळी करण्यात आला. महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल आणि यशस्वी विध्यार्थ्यांची यशोगाथा अनेक विध्यार्थ्यांना समजावी तसेच महाविद्यालयाने अजूनपर्यंत मिळवलेलं यश अनेक माजी विध्यार्थ्यांना समजावं, हाच उद्देश या कार्यक्रमाचा होता. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या मनोगताच्या माध्यमातून विद्यालयाबद्दलच्या आठवणी सांगितल्या, तर माजी शिक्षकांनीदेखील जुन्या आठवांनीना उजाळा दिला.
बहुजनांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला. त्याच डी. एम. एस. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा 'स्नेहांकुर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा' आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमावेळी राजाभाऊ पाटील (उपाध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव), प्रा. विक्रम पाटील (सह-सचिव डीएमएस, एन. एम. पाटील सर स्कुल कमिटी अध्यक्ष), झेड. एन. पाटील (उपाध्यक्ष स्कुल कमिटी, विद्यालयाचे मुख्याध्यापक) एस. डी. घोळसे, विद्यालयाचे माजी मुख्याध्याक जे. व्ही. दुकळे , भाईदाजीबा देसाई मुख्याध्यापक पार्ले विद्यालय, माजी आमदार दिगंबर पाटील, सह ए.एन. गावडे, एस. बी. पाटील, यू. एस. कपिलेश्वरी, व्ही. एस. पाटील, एम. के. भुजबळ, बी. व्ही. केसरकर, पी. एस. पाटील, एस. एम. पाटील आणि आदी शिक्षकेत्तर कर्मचारी आणि इतर आजी-माजी विध्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. घोळसे तर सूत्रसंचालन बी. व्ही. केसरकर यांनी केले. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या पूर्णत्वास हातभार लावला. या कार्यक्रमास आठशेहून अधिक विध्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती, तर विद्यालयाच्या भौतिक सुविधांना घेऊन आजी माजी विध्यार्थ्यांनी चर्चा केली.
No comments:
Post a Comment