चंदगड आगाराच्या नांदवडे बसला पोलिस ठाण्याजवळ अपघात, बारा प्रवाशी जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2019

चंदगड आगाराच्या नांदवडे बसला पोलिस ठाण्याजवळ अपघात, बारा प्रवाशी जखमी

चंदगडहून नांदवडेला जाणारी बस सरकारी रुग्णालयाच्या संरक्षक कठड्याला जावून थडकल्याने अपघात झालाा. 
चंदगड/प्रतिनिधी
चंदगड आगाराच्या बस.क्रमाक एम एच 20- 9008 ची ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक कठड्यावर धडकल्यामुळे बसमधील बारा प्रवासी जखमी झाले. ही घटना दुपारी बारा-साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये 
प्रियांका प्रकाश पाटील (शिप्पूर), शितल लक्ष्मण गावडे (कोळींद्रे), रोहीणी धोडींबा पाटील (ढोलगरवाडी) व शितल आपय्या वाघराळे (बेळगाव) यांना गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी गडहिंग्लजला हलविण्यात आले आहे. अन्य जखमींची नावे अशी - कोमल लोहार (कडलगे खुर्द), मोहिनी गावडे (खालसा सावर्डे), आप्पय्या वाघराळे (बेळगाव), आशा पाटील (ढोलगरवाडी), निकिता लोहार (कडलगे बुद्रुक), यास्मीन सय्यद (हेरे), संध्या माळी (सुळये) व मुलगा प्रशांत संदिप माळी (वय- अडीज वर्षे, रा. सुळये).  
चंदगड आगारातून नांदवडे गावी जाणाऱ्या या बसला नेहमीच मोठी गर्दी असते. दुपारच्या वेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात. मात्र सद्या दिपावली सुट्टी असल्याने विद्यार्थी फारसे नव्हते. पण ऐन सणाच्या हंगामामुळे बसला गर्दी असते, असीच आजही गर्दी होती. बस स्थानकावरून सुटल्यानंतर केवळ एका मिनिटात हा अपघात घडला. बस ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक कठड्याला जावुन आदळली. या ठिकाणी रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. एका मोठ्या खड्यादरम्यान बस आली असता चालकाने ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केला असता बसचे स्टेरिंग लॉक झाले आणि बस चालकाच्या दिशेला जावून समोरच्या संरक्षक भिंतीवर जोराने आदळली. त्यामुळे बसमधील प्रवाशी समोरील सीटच्या लोखंडी बारवर जावून आदळले. यामध्ये कोणाच्या तोंडाला, कुणाच्या डोक्याला मार लागुन रक्तस्त्राव होवू लागला. या बसमध्ये तीन महीण्यादरम्यान जन्मलेल्या बाळासह आई प्रवास करत होती. अपघातवेळी बाळ
खाली पडता-पडता संध्या माळी यांनी सावरल्याने वाचले.
घटनेची माहिती लोकांना समजताच सरकारी रुग्णांलयामध्ये नातेवईकांची गर्दी जमली. येथे जखमीवर यावेळी उपचार केला जात होता. यावेळी उपस्थित एस टी कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला सामोरी जावे लागले. मात्र अपघाताचे कारण हे खड्यामुळे झाले आहे, हे समजताच नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. आज शासकीय सुट्टी असल्याने बांधकाम कार्यालयाकडे जाणाऱ्या लोकांनी आवर घातली. आता पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने तालुक्यातील रस्ते त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. सध्या चंदगड ते चंदगड फाटा दरम्यानचा रस्ता अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरूस्ती करणे जरूरीचे आहे.

No comments:

Post a Comment