साहित्य रत्नंकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत आनंदमय दिवाळी साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2019

साहित्य रत्नंकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत आनंदमय दिवाळी साजरी

साहित्यरत्न ग्रुपने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यासोबत साजरी केली दिवाळी. 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
समाजात अनेक घटक अवतीभोवती वावरत असतात पण त्यांच्याकडे इतक्या डोळसपणे पाहिले जात नाही.त्यातीलच एक म्हणजे ग्रा.पं.कर्मचारी होय. ज्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजता संपतो. ज्यांचा संबंध गावातील प्रत्येक कुटंबाशी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीशी येतो अशी व्यक्ति म्हणजे ग्रामपंचायतमधील पाणी सोडणारी व्यक्ती. कोणत्याही कार्यक्रमात दुर्लक्षीत पण कामाची. अशा लोकांना एकत्र आणून त्यांना सन्मान  मिळवून देण्याचे काम साहित्यरत्नंने केले आहे.
तालुक्यातीत साहित्य रत्नं या ग्रुपकडून दरवर्षी वंचिताची दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी ग्रामपंचापयतीमध्ये पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत साहित्यरत्नंने आपली अनोखी दिवाळी साजरी केली.
पाटणे फाटा येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीकांत राऊत ,साताप्पा पाटील, शशीकांत परीट, विलास कांबळे यांचा फराळ,भेटवस्तू व सुरक्षेच्या दृष्टीने रबरी मोजे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्यरनंचे जयवंत जाधव म्हणाले, ' ग्रामपंचायतीचे पाणी सोडणारे गाव कामगार प्रामाणिकपणे काम करून गावची तहान भागवत असतात. अशा लोकांना सोबत आनंददायी दिवाळी साजरी करुन वेगळा आनंद मिळाला. ' यावेळी समुहाचे बी.एन. पाटील म्हणाले की,साहित्यिकांनी समाजात अशा अनेक गोष्टीची भर घातली पाहिजे.दुर्लक्षित,वंचित समुहासोबत काम केले पाहिजे. यावेळी राजेंद्र शिवणगेकर, संजय साबळे,सतिश कागणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाला विलास कागणकर,कमलेश जाधव, हणमंत पाटील,कार्तिक पाटील व ग्रा.पं.कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रमोद चांदेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment