![]() |
पारगड (ता. चंदगड) येथे |
चंदगड / प्रतिनिधी
पारगड (ता. चंदगड) येथे चंदगडच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गप्रेमी युवकांनी पारगडावर दिवाळीत दीपोत्सव साजरा केला. या उपक्रमात पारगड शेकडो दीपांनी उजळून निघाला.
दिवाळीनिमित्त बालचमूंनी मेहनतीने बनविले गडकिल्ले, कसे आहेत हे किल्ले वरील व्हीडीओमध्ये पहा.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिवाळीत दुर्गसंवर्धन तसेच दुर्गविषयक अन्य उपक्रम तसेच किल्ला स्पर्धाचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचे यंदा आठवे वर्ष. तसेच गेल्या चार वर्षपासून दीपोत्सव साजरा करण्यात येतो शिवकाळातील आठवणींना उजाळा देण्याबरोबरच आपल्या ऐतिहासिक ठेव्याविषयी युवकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न व्हावी या हेतूने या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा दिवाळीनिमित्त पारगडावर दीपोत्सव, गडपूजन असा उपक्रम करण्यात आला. पारगडावरील भगवतीदेवीचे मंदिर, मारुती मंदिर यासह शिवस्मारक व काही स्मरकांची साफसफाई शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रारंभी केली. त्यानंतर गडावर मारुती मंदिर आणि भगवती मंदिर यांच्या प्रांगणात शेकडो दिवे लावून गडावर दीपोत्सव करण्यात आला. गडावर आलेले इतर दुर्गप्रेमीही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या वेळी गडावरील शिवरायांच्या स्मारकाच्या आणि भगवती देवीच्या मूर्तीला पुष्पहारही अर्पण करण्यात आले.
No comments:
Post a Comment